पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. पुण्यात आणखी 3 रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 101 वर गेला आहे. राज्यात कोरोनाबधितांची संख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली.
पुण्यात कोरोना बधितांची संख्या 19 वर पोहचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील राज्यातील बस आणि लोकल सेवा बंद करण्यात आली आहे.
मात्र काल संध्याकाळपर्यंत पुण्यातील पीएमपीएमएल ची बससेवा सुरूच होती. राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली असतानाही पीएमपीएमएल ची तेव्हा सुरूच होती.
त्यावर परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट स्वारगेट येथील मुख्यालयात जाऊन बंद केली. महापौर मोहोळ यांनी मुख्यालयात जाऊन पीएमपीएमएल च्या अध्यक्षा नयना गुंडे यांना वस्तुस्थिती आणि नागरिकांच्या मागणीची माहिती देत सेवा बंद करण्याची सूचना केली. या सूचनेनुसार गुंडे यांनी निर्णय घेत दुपारी पाचपासून बस बंद करण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत बससेवा थांबवणे आवश्यकच होते. संध्याकाळी पाचनंतर एकही बस डेपोच्या बाहेर पडणार नसून केवळ अत्यावश्यक सेवेपुरत्याच बसेस उपलब्ध होणार आहेत.
महापौर मोहोळ म्हणाले, पुण्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक असून मी आधीपासूनच सार्वजनिक बससेवा बंद करण्यासाठी प्रयत्न करत होतो. कोरोनाच्या आपण दुसऱ्या टप्प्यात असलो तरी तिसऱ्या टप्प्याची भीती आपल्या सर्वांसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर वेळीच पावले उचलणे अपेक्षित आहेत. त्याचनुसार निर्णय घेऊन बससेवा बंद केली.


