अमरावती: राजकीय, सामाजिक कामात नेहमी चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अमरावती शहरातील क्रांती कॉलनी येथे या दिवसाचे औचित्य साधुन महीलांसाठी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरल्या खासदार नवनीत राणा. त्यांनी स्वतः या स्पर्धेत भाग घेतला.
एखाद्या अष्टपैलू खेळाडू सारख्या नवनीत राणा ह्या खो-खो खेळल्या. त्याचबरोबर धावण्याच्या स्पर्धेत देखील त्यांनी पारितोषिक मिळवलं. खो-खो या स्पर्धेत नवनीत राणा यांनी चक्क प्रथम क्रमांक पटकावला. त्यांचा खो-खो खेळतानाचा हा व्हिडिओ अमरावतीत तुफान व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या:


