🕒 1 min read
मुंबई : ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यानंतर आता अभिनेता किरण माने यांनीही या चित्रपटाबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता किरण माने हे फेसबुकवर कायमच चर्चेत असतात. ते नेहमी फेसबुकवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकतंच किरण माने यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी नागराज मंजुळे आणि ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे यासोबत त्यांनी नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केली आहे.
काय बोलले किरण माने नगराजच्या ‘झुंड’ वर
“…नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालो होतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा”, असे किरण मानेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
