🕒 1 min read
जुन्नर- काल 19फेब्रुवारी रोजी लोककल्याणकारी राजा छ. शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. छ. शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी जुन्नर येथे दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमी येत असतात मात्र यंदा कोरोना आजाराचे संकट असल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासह मोजक्या संख्येत शिवजन्मोत्सव संपन्न झाला.
दरम्यान, काल अनेक शिवभक्त या ठिकाणी येवून गेले मात्र शिवप्रेमीमध्ये परप्रांतीय असलेल्या गोविंद यादव या सायकलस्वाराची चर्चा संपुर्ण जुन्नर तालुक्यात होत आहे. उत्तरप्रदेश मधून हजारो किमी अंतरावरून सायकल वर शिवजन्मभूमीत महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गोविंद आला होता.मात्र त्याला पास नसल्याने महाराजांचे दर्शन काल घेता येत नव्हते.अश्या संकट काळात गोविंद यादव यास नारायणगाव येथील सुरज वाजगे यांनी स्वतःचा गेट पास देवून महाराजांचे दर्शन घडवले.
गोविंद बनारस येथून 26जानेवारी रोजी छ. शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जुन्नर येथे दि 19फेब्रुवारी रोजी दाखल झाला. मात्र मोजक्या लोकांना गडावर जाण्याची मुभा असल्याने गोविंद जाउ शकणार नव्हता. ही बाब युवा कार्यकर्ते सुरज वाजगे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी स्वतः चा पास गोविंद यास देऊ केला.
विशेष म्हणजे गोविंद याने बनारस येथून गंगा नदीचे जल आणून त्या जलाचा जलाभिषेक महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणले होते. हजारो किलोमीटर सायकलवर गंगाजल घेऊन येणारा शिवभक्त गोविंदने यानंतर शिवनेरीवर महाराजांना जलाभिषेक केला. यावेळी स्वतः खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके व शिवभक्त उपस्थित होते.
महाराजांबद्लची आत्मीयता लक्षात घेता एका परप्रांतीय शिवभक्ताची चर्चा संपूर्ण जुन्नर परिसरात सुरु आहे. गोविंद पर्यावरण बचावासाठी सायकल रॅली द्वारे जनजागृती करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मित्रानेच दारू पाजून केला खून; लखन सोनवणेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
- ‘रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का?’
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
