Share

राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात, या पुरात ते वाहून गेलं का, पाहावं लागेल-संजय राऊत

Published On: 

मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलारही होते. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल हे नेहमी घटनेचे पुस्तक चाळून काम करतात. या पुरात घटनेचं पुस्तक वाहून गेलं का मला पाहावं लागेल, असा टोला लगावत संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. विधिमंडळात काही आमदारांनी गोंधळ घातला त्या आधारावरच विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसारच त्यांचं निलंबन केले आहे. मात्र राज्यपाल विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत. विधानसभेचं अस्तित्व आणि घटनेने दिलेले अधिकार राज्यपाल मानत नसतील. त्या संदर्भात सरकार काय करते ते पाहावं लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना निरोगी आरोग्य लाभण्याची प्रार्थना संजय राऊत यांनी केली आहे.तसेच ते राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्कृष्ट नेतृत्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबत त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाना साधत राज्यपाल केंद्राकडून अधिकाधिक मदत आणतील असा विश्वासही  दाखवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!