नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिकमधील मालेगावात झालेल्या एक सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ज्यादिवशी मी मुलाखत देईन त्यादिवशी राज्यात भूकंप होईल”, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तसेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शिवसेना पुढे घेऊन जायची आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “जर आम्ही चुकलो असतो तर जनतेनी आम्हाला समर्थन दिलंच नसतं. मात्र जनता आमच्यासोबत आहे. तसा विश्वास खुद्द जनतेनेच आम्हाला दिला आहे. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे तिथे माझं आनंदात स्वागत झालं आहे. लोकं रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहून माझं स्वागत करत होते. जर त्यांचं आम्हाला समर्थन नसतं तर त्यांनी आम्हाला बघून तोंडं फिरवली असती. मात्र तसं होत नाहीये.” तर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर अनेक आरोप केले होते त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले कि, ज्यादिवशी मी मुलाखत देईन त्यादिवशी राज्यात भूकंप होईल.”
एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेचे आमदार फोडल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, “आम्ही कुणालाही पळवून नेलं नाही. आम्ही गद्दारीही केली नाही. उलट एवढे वर्ष ज्यांच्याविरोधात होतो. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत ते मुख्यमंत्रीपदासाठी गेले. मग खरी गद्दारी कुणी केली?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच आनंद दिघेंबरोबर जे काही राजकरण झाले, त्याचा खुलासा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि, राज्यापालांचं विधान वैयक्तिक, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई मिळाली. बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहीत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. राज्यपालांनीही खुलासा केला आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. संविधानिक पद आहे. त्यामुळे कुणाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसाच्या त्याग आणि योगदानाची अवहेलना करता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde । “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, त्यामुळे त्यांनी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला
- Udhdav Thackeray : “…हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन”, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!
- Devendra Fadnavis । राज्यपालांच्या विधानाशी भाजप सहमत नाही – देवेंद्र फडणवीस
- Sandeep Deshpande | ज्या गोष्टी माहित नाहीत, त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये – संदीप देशपांडे
- Uddhav Thackeray | “…तर ते कोश्यारी नावाचं पार्सल तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे


