नाशिक : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी व राज्यपाल यांच्यात वाद सुरु झालेला आहे. कोरोना काळात मंदिर उघडण्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पुरोगामी झाला आहात का असा सवाल केल्यानंतर खळबळ माजली होती.
आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनावरून राज्यपालांवर टीकेची झोड उठवली गेली. काही दिवसांपूर्वीच राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याने राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली होती.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आमदार निवडीवरून काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा राज्यपालांच्या कार्यशैलीवर प्रश्न खडा केला आहे.
‘राज्यपालांनी नवीन आमदारांना अधिवेशनामध्ये येण्यासाठी संधी द्यायला हवी. मात्र, ते विधानसभा अध्यक्षांच्या निवडी संदर्भात एक निर्णय घेत आहेत. आणि नवीन आमदारांच्या निवडी संदर्भात एक निर्णय, त्यांची अशा प्रकारे वेगवेगळी भूमिका का आहे? याबाबत प्रश्नचिन्ह आहे’, असे मत थोरात यांनी व्यक्त केले आहे.
‘राज्यपाल हे नवीन आमदारांच्या हक्कांवरती गदा आणत आहेत. नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी घटनेप्रमाणे नवीन आमदारांची नावे घोषित करणे अपेक्षित आहे. परंतु तेच राज्यपाल वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचे आता राज्यासमोर येत आहे.
विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यानंतर राज्यपालांनी तातडीने या ठिकाणी अध्यक्ष नियुक्त करावा, असे सरकारला सूचित केले आहे. परंतु त्याच विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या सभागृहासाठी आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपाल मान्य करत नाहीत, अशी भूमिका का घेतात? राज्यपालांच्या या दुहेरी भूमिकेबाबत आता संशय येत आहे. याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे, तो सहयोगी मित्र पक्षांबरोबर चर्चा करून घेतला जाईल’, असं थोरात यांनी म्हंटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- मुकेश अंबानी उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

