Share

राज्यपाल महत्वाची व्यक्ती, त्यांचाही आदर ठेवला पाहिजे-अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल महाविकास आघाडीने राज्यपालांना सकाळी ११ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय कळवा अन्यथा निवडणूक घेण्यात येईल, असा  अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंद लिफाफ्यात एक पत्र दिले आणि महाविकास आघाडीने नरमाईची भूमिका घेत हि निवड पुढे ढकलली. या पत्रात राज्यपालांनी काय लिहीले होते याची माहिती मात्र समजू शकली नाही.

काल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते तयारीत होते. मात्र राज्यपालांनी ही निवडणूक गुप्त मतदानाद्वारेच करण्याचा निर्णय दिला होता, तर महाविकास आघाडी सरकार आवाजी मतदानावर ठाम होते.

राज्यपालांच्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवड पुढे ढकलल्याची माहिती दिली. तसेच महामहिम राज्यपाल ही पण एक महत्त्वाची व्यक्ती आहे, त्यांचाही आदर ठेवला पाहिजे. अशी आमची सगळ्यांची भावना होती, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

आता २९ फेब्रुवारीला नागपुरात अधिवेशन घ्यायचे ठरले आहे. या मधल्या काळात याबाबत शंका-कुशंका राहणार नाहीत, बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटू शकलो असतो, पण घटनेची कुठेही पायमल्ली झाली नाही पाहिजे, हे आम्हा तिन्ही पक्षांचं मत आहे, आम्ही प्रमुख लोक राज्यपालांची पुन्हा भेट घेणार आहोत, पुन्हा पारदर्शी चर्चा होईल, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!