🕒 1 min read
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. आज म्हणजेच १५ ऑगस्ट व उद्या १६ ऑगस्ट रोजी ते पुण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. आज सकाळी विधानभवन, पुणे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. यांनतर त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेण्यासाठी आंबेगाव येथील शिवसृष्टी गाठली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली.तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नुकतंच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याने त्यांना विविध नेते हे शुभेच्छा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुरंदरे यांचा नागरी सत्कार देखील करण्यात आला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली.तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. @MahaDGIPR pic.twitter.com/p2296BRQKx
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) August 15, 2021
…म्हणून राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला झापले
पुणे येथे आज सकाळी स्वातंत्र्यदिनानिमत्त विधानभवन येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्यपाल कोश्यारी आणि पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेत होते. यावेळी भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या शेजारी उभे असलेल्या काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी हात जोडून थेट राज्यपालांनाच बारा आमदारांची नियुक्ती लवकरात लवकर करा अशी विनंती केली.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत, ‘अजित दादा इथे आहेत, ते माझे मित्र आहेत, ते सरकारमध्ये आहेत…ते मला विचारणा करत नाहीयेत, तुम्ही का विचारणा करताय? असे सुनावले. यानंतर शरद रणपिसे म्हणाले की, सगळं तुमच्यावरच सोडून देतो. यावर राज्यपाल उत्तरादाखल म्हणाले की, मला सुद्धा बारा आमदारांच्या नियुक्तीची काळजी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यामधील सर्व यंत्रणा सज्ज – पालकमंत्री सुभाष देसाई
- ‘…तर ते थांबलच पाहिजे’; गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात झाली चूक; भाजप आमदार म्हणाला, ‘अभ्यासू आणि ब्येष्ट’
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- ‘असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
