Share

‘समाजसुधारकांची पुस्तके ब्रेल लिपीत करण्यास सरकार मदत करणार’

Published On: 

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात देशातील प्रत्येक घटकाला घटनेत संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रत्येक घटकाला या घटनेत काय तरतूद करण्यात आली आहे. याची माहिती असणे आवश्यक असून त्यासाठी देशातील समाज सुधारकांचे साहित्यदेखील ब्रेल लिपीतून तयार होणे आवश्यक असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

सर्व अंध बांधवाना घटनेत काय लिहिलंय याची माहिती होण्यासाठी ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ व बार्टी या संस्थेच्या वतीने ब्रेल लिपीत भारतीय संविधानाचे रूपांतर असून महाज्योती, बार्टी, सारथी या संस्थांच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य शासनस्तरावरून करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ नाशिक या संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ब्रेल लिपीतील भारतीय संविधानाच्या आवृत्ती’चे भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रकाशन करण्यात आले.

छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने वर्षभरात ७५ लाख नागरिकांचे नेत्रदान करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मोहिमेत स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी आपला सहभाग नोंदवत नेत्रदानाची नोंदणी केले आहे. अतुल मते युवा मंच आडगाव व माजी नगरसेवक हरिष भडांगे यांच्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जागतिक अंधदिनाच्या निमित्ताने अंधांना मिठाई, कपडे तसेच इतर विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!