Share

‘सरकारने आणखी निष्पाप स्वप्निलचे बळी घेऊ नये’ ; दरेकरांनी घेतली लोणकर कुटुंबियांची भेट

Published On: 

पुणे : एमपीएससीच्या गोंधळाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचललेल्या पुणे येथील विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज पुणे मधील फुरसुंगी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला. लोणकर कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले.

यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, ‘आज प्रत्येक कुटुंबात घुसमटलेला स्वप्निल आहे. त्यामुळे सरकारने एमपीएससीच्या उमेदवारांच्या नियुक्ता करेपर्यंत आणखी निष्पाप स्वप्निलचे बळी घेऊ नयेत. सरकारने तातडीने आयोगाचे सदस्य नियुक्त करुन एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या दिल्या पाहिजेत.’ अशी मागणी दरेकर यांनी आज केली.

तसेच दरेकर यांनी सांगितले की, ‘ज्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परिक्षा झाल्या आहेत व जे मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात. त्यामुळे स्वप्निल सारख्या अन्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने सरकारने तातडीने पावले उचलावित,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!