Share

‘निलंबनाची कारवाई करुन एसटी चालू करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकार करतंय’

Published On: 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून आपल्या विवध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेल्या दहा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर या कमर्चाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र विलीनीकरण सोडून अन्य प्रश्नावर चर्चा करण्यास परिवहन मंत्री तयार असून विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

आता यावर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे. दरेकर म्हणाले, ब्रिटिश गेले पण अजून त्यांचा प्रभाव आणि संस्कृती जायला तयार नाही, त्यामुळे तोडा आणि फोडा अशी भूमिका परिवहनमंत्री आणि सरकार घेताना दिसत आहे. एका बाजूला दबावाचं राजकारण, निलंबनाची कारवाई, सेवा समाप्तीच्या नोटिसा आणि आता हंगामी कर्मचाऱ्यांवर दबाव  आणून एसटी चालू करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करताना दिसत आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांमध्ये आता संतापाची भावना निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीने अनेक कर्मचारी कामावर हजर होत आहेत. काल रत्नागिरी विभागातील १४३ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल थांबवा असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!