🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससी (MPSC) परीक्षा पास होऊन वर्ष उलटले तरीही मुलाखतीची यादी एमपीएससी आयोगाने प्रसिद्ध केली नाही, या नैराश्यातून पुण्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. मात्र आत्महत्येला सहा महिने उलटले असून नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत त्याचे नाव आले आहे. यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
याबाबत गोपीचंद पडळकर ट्विट करत म्हणाले, ‘आधी उत्तीर्ण होऊन दिड वर्ष झाली तरी मुलाखतीला बोलवलं नाही. म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं आता आत्महत्येचीही क्रूर थट्टा करतायेत. प्रस्थापितांच्या सरकारला कसलीच लाज उरली नाहीये. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या या गिधाडी प्रवृत्तीचा धिक्कार असो.’ असे ट्विट गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
आधी उत्तीर्ण होऊन दिड वर्ष झाली तरी मुलाखतीला बोलवलं नाही. म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं आता आत्महत्येचीही क्रूर थट्टा करतायेत. प्रस्थापितांच्या सरकारला कसलीच लाज उरली नाहीये. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या या गिधाडी प्रवृत्तीचा धिक्कार असो.#JusticeForSwapnil #MPSC pic.twitter.com/ccJBhkJGed
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) December 14, 2021
स्वप्नील लोणकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील फुरसंगी येथे गळफास लाऊन त्याने आत्महत्या केली होती. २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. त्यानंतर १ वर्षे उलटूनही एमपीएससी आयोगाने मुलाखतीची यादी प्रसिद्ध केली नाही, या नैराश्यातून स्वप्नीलने आत्महत्या केली होती. एमपीएससीने नुकतीच मुलाखतीसाठी यादी जाहीर केली आहे. त्यात स्वप्नीलचे नाव आले असून विरोधकांसह विद्यार्थ्यांतूनही प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. एमपीएससीनेच माझ्या मुलाचा बळी घेतला, अशी संतप्त प्रतिक्रिया संदीपच्या वडीलांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
