मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होत आहे.
जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील या प्रकरणावरून कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
पुढे त्यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि कोव्हीड योद्धयांच्या रखडलेल्या मानधनावर देखील भाष्य केलं. ‘हे सरकार उडाणटप्पू आहे आणि हा संसदीय शब्द आहे. विधानसभा चमकवण्यासाठी 15 कोटी रुपये आहेत पण गोर-गरीबांसाठी पैसै नाही. कोविड योद्धे म्हणून अभिनंदन करता आणि त्यांना देण्यासाठी 6-6 महिने पैसे नाही हे करंटं सरकार आहे’ अशी बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केली.
तर, पुढे त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे राजकीय लव्ह जिहाद असल्याचं म्हटलं आहे. ‘आमची अजित पवारांशी 72 तासांची मैत्री होती पण तरीही मैत्री कायम आहे. पण शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले हा राजकीय लव्ह जिहाद होता’ असा घणाघात देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड
- खास फीचर्सने ग्राहकांना आकार्षित करणाऱ्या रेनो किगरची डिलीव्हरी सुरु
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा


