Share

लाल दिव्याची हौस उपायुक्तांच्या अंगाशी

Published On: 

औरंगाबाद, – लाल दिव्याची मोटार दिमतीला असावी म्हणून अग्निशामक विभागाची मोटार वापरणारे मनपा उपायुक्त निकम यांना आयुक्त मुगळीकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ऐन दिवाळीत निकम यांनी अग्निशमक  विभागाची अंबर दिव्याची मोटार वापरली होती. सोमवारी दिव्याच्या मोटारीसह निकम यांचे छायाचित्र व्हायरल झाले. वृत्तपत्रांत याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज मुगळीकर यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

यात निकम यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला असून दिव्याच्या मोटारीच्या चालकाचाही जबाब नोंदवला जाणार आहे.निकम यांनी कोणाला फोन करून लाल दिव्याची मोटार मागवून घेतली, त्यांनी अग्निशामक विभागाला पत्र दिले होते की फक्त फोनवरून मोटार त्यांच्या दिमतीला देण्यात आली. अग्निशामक विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांच्याकडूनही याची माहिती घेतली जाणार आहे.

त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे मुगळीकर यांनी स्पष्ट केले. मनपा आयुक्तांच्या मोटारीलाही लाल दिवा नाही. केवळ दिवा हवा या अट्टहासापोटी तत्कालीन आयुक्त कांबळे यांनी अग्निशामक विभागाची मोटार वापरली होती. त्यानंतर कोणीही ही मोटार वापरली नाही. आता निकम यांनी केवळ मोटारीवर दिवा हवा म्हणून ही मोटार वापरली.

अग्निशामक विभागाचे विभागप्रमुख या नात्याने निकम मोटार वापरु शकत असले तरी ती कोणत्या कामासाठी वापरली, हे महत्त्वाचे आहे. निकम हे रजेवर होते आणि रजेच्या काळात वैयक्तिक कामासाठी त्यांनी मोटार वापरल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. निकम यांचा खुलासा आल्यानंतर उपायुक्त अय्युब खान सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!