🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना धारेवर धरणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे नांदेडला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांमागे सध्या ईडी, सीबीआयसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या येत्या 26 आणि 27 तारखेला नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत.
ईडीची पुढील कारवाई अशोक चव्हाण यांच्यावर होणार का? या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्या हसण्यावरुन समजून जा, अशा शब्दात संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करुन किरीट सोमय्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी 21 ऑक्टोबरला ट्वीट करुन आपण 26 आणि 27 ऑक्टोबरला नांदेड आणि लातूरला जाणार असल्याची माहिती दिली होती. ‘सोमय्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमय्याजी, आपण 26 ला नांदेडला येणार असं कळतंय. मी अगोदरच आलोय. नांदेडमध्ये तुमचं स्वागत आहे’, असं ट्वीट केलं आहे.
सोमय्याजी,
आपण २६ ला नांदेडला येणार असं कळतंय.
मी अगोदरच आलोय. ????
Welcome ???? to Nanded https://t.co/rrDkrM8dRW— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 24, 2021
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
