Share

अजितदादांच बोलणं टग्यासारखं पण रडणं बाईसारखं : गोपीचंद पडळकर

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

ही निवडणूक राष्ट्रवादीसह भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस व इतर दिग्गज नेते देखील पंढरपुरातील निवडणुकांसाठी सक्रिय झाले आहेत. यामुळे राज्यात कोरोनाची चिंता वाढत असली तरी पंढरपुरात मात्र राजकीय धुरळा सुरु असल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार असला तरी वंचितसह अपक्ष उमेदवारांमुळे ही लढत चुरशीची होणार आहे.

दरम्यान, एका प्रचारसभेवेळी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत बोचऱ्या भाषेत अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. ‘अजित पवार या मतदारसंघात फिरतायत. असा बोलतोय गडी नुसता टग्यासारखा. बोलणं त्यांचं टग्यासारखं आहे पण रडणं बाईसारखं आहे. मागे ईडीची नोटीस आल्यानंतर ते ईडीसमोर घडाघडा रडले. आम्हाला कितीवेळा जेलमध्ये टाकलं, पण आम्ही रडलो का ?’ अशा शब्दांत पडळकरांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!