Share

अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवण्याचं काम केलं; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला होता. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता 25 मे 2004 च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते.

यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, भाजपसह इतर विरोधी पक्षांनी देखील या निर्णयाला विरोध केला. दरम्यान, यावरून महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं असून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

‘पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे पुढे आली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आहेत, भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी आहेत, तसेच विशेष मागास प्रवर्गही आहे. या सर्वांच्या बाबतीत, ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी, या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवांचा नांगर फिरविण्याचं काम केलंय, हे सुस्पष्टपणे दिसतंय,’ असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष आहे. 5 वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे,’ अशी टिप्पणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!