🕒 1 min read
मुंबई – क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ६ ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB चे भाजप कनेक्शन उघड केले होते आणि आज नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे मोहित कंभोज यांच्या मेहुण्याला ताब्यात घेऊनही सोडल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर मांडून खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केल्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मलिक यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, नवाब मलीक यांना बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झालीये. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकलीये. त्या क्रूजवर तेराशे लोकं प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे होते.आणि तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला. त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केलीये.उर्वरीत लोकाना एनसीबीने सोडलेले आहे.
मुळात तुमचं वसूली सरकार हे वसूलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागतेय. तुमच्या स्वताच्या जावायाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली असताना तेंव्हा तुम्ही कशासाठी गप्प बसले होता? नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरूख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची चिंता आहे? असे तर नाही ना की NCB ने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्स टोळक्यांशी असणारे लागेबांधे ऊघडे पडणार आहेत ? या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- ‘मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?’, दरेकरांचा सवाल
- संतपीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणारा अभ्यासक्रम सुरू करा- उद्योग मंत्री


