Share

‘अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसलेत त्यांच्याशी…’, पडळकरांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना पडळकर म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला फक्त विलिनीकरण करा असं म्हणत नाही, तर पर्याय पण देतोय. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसं मिळू शकतं हे सांगितलं. आम्ही फक्त बोलत नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या ७ तारखेला झाले पाहिजे. एक दिवस सुद्धा पुढे गेला नाही पाहिजे. तुम्ही राज्य सरकारमध्ये आम्हाला घेऊ शकता. हे कष्टकरी पैसे आणून देतात. तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. तो भ्रष्टाचार थांबवला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर महामंडळांपेक्षा दुप्पट होऊ शकतो. पण यांना तो भ्रष्टाचार थांबवायचा नाही. त्यांचा जीव तिथं अडकला आहे.’

दरम्यान,’एसटी कर्मचाऱ्यांनी ताकदीने या आंदोलनात भाग घेतल्यामुळे आज सरकारच्या नाकीनऊ आलाय. सरकारला काही सुचेना. त्यांना काय करावं कळेना. काल तर त्यांनी हे आंदोलन नेतृत्वहीन झालंय असं म्हणत आम्ही बोलायचं कुणाशी असं विचारलं. अरे बोलायचं कुणाबरोबर इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसलेत त्यांच्याशी येऊन बोला ना. मी आझाद मैदानावर बोलत असताना माझा आवाज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जात असेल आणि त्यांना ऐकू येत असेल तर तो आवाज या महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा आहे’, असेही पडळकरांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!