Share

उगा आता पंतप्रधानांना हात जोडू नका, नियुक्ती पत्रावरुन पडळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे. त्यात आता बहुजन बांधवांनाही नियुक्त्या देण्याची मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. मात्र, ही मागणी करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ही बाब तुमच्या अधिकारातली असल्याचेही पडळकर यांनी म्हटले आहे.

या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये मराठा समाजाबरोबरच भटके विमुक्त, अनुसुचीत जाती व जमाती यांचीही भरती प्रक्रिया रखडली आहे. त्या सर्वांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर पाल्य आदित्य ठाकरेला जसे मंत्रीपदाचे नियुक्ती पत्र दिले, तसे बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

 

या संदर्भात पडळकर यांनी सोशल मीडियावर मागणीचे पत्र शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘उद्धवजी ज्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर लगेचच आपल्या पाल्याला आदित्य यांना मंत्रीपदी नियुक्ती दिली, त्याचं तत्परतेनं बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात आणि ही बाब तुमच्याच अधिकारातली.. उगा आता पंतप्रधानांना हात जोडू नका.’

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!