🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या शहरांमध्ये वा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या ही कमी असेल तिथे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाईल, अशी माहिती दिली होती.
आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ जिल्ह्यांतील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स फक्त २५ टक्के व्यापलेले असतील तिथे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार सुरु होणार असून जनजीवन देखील सुरळीत होणार आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश ?
राज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे याची अंमलबजावणी उद्यापासूनच करण्यात येणार आहे.
१८ जिल्ह्यात या गोष्टी होणार सुरु –
रेस्टॉरंट, मॉल्स
गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील
खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
चित्रपट शुटींगला परवानगी
थिएटर सुरू होतील
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यासाठी १०० टक्के सूट मात्र २०० लोकांची मर्यादा.
ई कॉमर्स सुरू राहिल.
जिम, सलून सुरू राहणार.
जमावबंदी राहणार नाही.
बस 100 टक्के क्षमतेने.
आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल.
इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील.
राज्यातील ५ स्तर कसे ?
पहिला स्तर- पूर्णपणे अनलॉक
दुसरा स्तर- मर्यादित स्वरुपात अनलॉक
तिसरा स्तर- निर्बंधासह अनलॉक
चौथा स्तर- निर्बंध कायम
पाचव्या स्तर- रेड झोन, पूर्णपणे लॉकडाऊन
महत्वाच्या बातम्या
- “आज मुंडे साहेब असते तर मराठा समाजावर हा अन्याय झाला नसता”- पंकजा मुंडे
- HSC : बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब !
- इराणच्या नौसेनेला तगडा झटका; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली
- ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’; किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवर मनसेची टीका
- ‘…हा शब्द देतो’; गोपीनाथरावांच्या पुण्यतिथीदिनी धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

