🕒 1 min read
औरंगाबाद : शिवजयंती निमित्त औरंगाबाद येथील सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपतर्फे शुक्रवारी(दि.१९) औरंगाबाद शहरात आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम क्रांती चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या अभिनव उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शहरातील भिकाऱ्यांना स्वच्छ, टापटीप करुन जंटलमन बनवत शिवरायांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
गरीब निराधार मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजूनही जिवंत आहे हे समाजसेवक सुमित पंडित यांनी आज पुन्हा एकदा दाखवुन दिले. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पर्वावर भिकाऱ्यांना जंटलमन बनवण्याचा ध्यास मनी घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला. दरवर्षी शिवजयंतीस वेगवेगळ्या ठिकाणी सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हे कार्य करते. आज सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसर या भागात असणाऱ्या बेवारस निराधारांना एकत्र करण्यात आले.
त्यांना जमा करून प्रथम त्यांची दाढी कटिंग करण्यात आली. त्यानंतर त्यांची आंघोळ करून परिधान करण्यासाठी नवीन कपडे देण्यात आले. नवीन कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसूच आमचे समाधान असल्याची भावना माणूसकी समुहातील सदस्यांनी व्यक्त केली. यावेळी स.पोलिस निरक्षक संजय बनसोडे, विशाल टिंप्रवार, भरत कल्याणकार, ज्यूनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने, पुजा पंडीत उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- रेशनचा काळाबाजार, दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल
- पोलीस ऍक्शन मोडमध्ये : …तर वनमंत्री संजय राठोड यांची पुणे पोलीस करणार चौकशी
- महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी-पंकजा मुंडे
- …अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; भुजबळांचं सूचक विधान
- पोलीस ऍक्शन मोडमध्ये : …तर वनमंत्री संजय राठोड यांची पुणे पोलीस करणार चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

