🕒 1 min read
मुंबई : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
गेल्या १२ दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
राठोड गेल्या काही दिवसांपासून गायब असून त्यांचा फोनही लागत नाही. मंत्रिमंडळाची १७ फेब्रुवारी रोजी बैठक झाली या बैठकीला राठोड यांनी दांडी मारली. मात्र, ते इतर नेत्यांच्या संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत भाष्य केले आहे. ‘संजय राठोड यांच्या बाबतीत पोलीस चौकशी करत आहेत. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही हे माध्यमांनी ठरवू नये. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. सत्य समोर आणण्याची माध्यमांना घाई आहे तर, त्यांनी ‘पुछता हैं भारत’ची देखील चौकशी करा’, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांची डोळ्यांची भाषा अन् उद्धव ठाकरेंनी घेतली फिरकी
- शहराचा पाणी प्रश्न सुटला?
- ‘१ मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल’
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- दहशतवादी ज्या मलाला युसूफझाईला ठार मारू इच्छितात तिच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

