Share

खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण जगभरावर घोंघावत असल्यामुळे जगभरातील नागरिक कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत. कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक देशांतील संशोधकही प्रयत्न करत आहेत. अशातच आता रिलायंस देखील कोरोनाची लस तयार करणार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या देशातील भारत बायोटेक, सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, जायडस कॅडीला यांसारख्या कंपन्याही लस तयार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. लसनिर्मिती करत असलेल्या कंपन्यांमध्ये आता रिलायंस लाईफ सायंसेज कंपनीचा समावेशही झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी या कंपनीला देखील आता परवानगी मिळाली आहे.

या महिन्यापासून या लसीची प्राण्यांवरील प्री क्लिनिकल टेस्ट सुरू होणार आहे. रिलायंसने जी नवीन लस तयार केली आहे. ती लस रीकॉम्बिनेंट प्रोटीनबेस्ड कोविड लस आहे. २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात या लसीच्या चाचणीचे परिणाम समोर येऊ शकतात. कोरोना काळात या कंपनीकडून टेस्टिंग कीट्ससह लॅबोरेटरी उत्पादनं तयार केली गेली आहेत. आता लसीची निर्मिती, वितरण, यांकडेही कंपनीकडून लक्ष केंद्रीत केलं जात आहे.लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, WHO च्या वतीने कोरोनावरील प्रभावी लस या वर्षाअखेरपर्यंत तयार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की, संपूर्ण जग ज्या व्हॅक्सिनची वाट पाहत आहे, या वर्षाअखेरपर्यंत ते व्हॅक्सिन तयार होणार आहे. तसेच त्यांनी दावा न करता अशी आशा असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!