🕒 1 min read
मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.
देशात आता अनलॉक-४ लागू करण्यात आला आहे. केंद्रासह राज्य सरकारने कालच नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार राज्यांतर्गत जिल्हाबंदी उठवण्यात आली असून ई-पास देखील रद्द करण्यात आला आहे. आता रेल्वे प्रवास देखील सुरु करण्यात येणार असल्याने लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार असला तरी लोकल मात्र अजूनही बंद ठेवण्यात आली आहे.
धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज कालवश!
मध्य रेल्वेने जारी केलेल्या एका पत्रामधून ही गोष्ट उघड झाली आहे. त्यासाठी उद्यापासून रेल्वेचे बुकिंग सुरू केले जाणार आहे. सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यांमध्ये जिल्ह्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्याला सुरुवात केली जाणार आहे. भारतीय रेल्वेवर सध्या ज्या 200 स्पेशल गाड्या धावत आहेत, त्याच गाड्यांमध्ये या नवीन नियमानुसार प्रवास करता येणार आहे. रेल्वे पूर्णतः सुरू करण्यात येणार नाही, या 200 रेल्वे गाड्यांचा सोबत ज्या स्पेशल राजधानी एक्सप्रेस चालवल्या जात आहेत त्यामध्ये देखील प्रवास करता येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले मुळा धरण ओव्हरफ्लो
दरम्यान, गेले काही दिवस, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारने ई-पास बंदी बाबत निर्णय घेतला नसल्याने भाजपा व मनसेकडून राज्य सरकारवर टीका केली जात होत. आता मात्र, राज्य सरकारतर्फे नागरिकांना खुशखबर देण्यात आली असून अनलॉक ४ अंतर्गत ई-पास पूर्णतः बंद करण्यात आला आहे. आज दिनांक १ सप्टेंबरपासून राज्यात मालवाहतूक वा खाजगी वाहनाने प्रवास करण्यासाठी आता ई-पासचे बंधन हटवण्यात आले आहे.
आमदार कीर्तिकुमार भांगडियांनी बोटीतून केली पूरस्थितीची पाहणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

