चिमूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या दौर्यावर असतांना आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी बेलगाव येथे भेट दिली. पुरामुळे या गावातील लोकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून, याची अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने गावांतील लोकांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी भेट देताच तेथील नागरिकांचा आक्रोश शांत झाला. आमदार भांगडिया यांनी गावांतील नागरिकांसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करून सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
इंजिन बोटीद्वारे पूरपरिस्थितीचे निरीक्षण करून आमदार भांगडिया यांनी स्थितीचा आढावा घेतला. यावेळी वसंत वारजूकर, दीपक उराडे, कृष्णा सहारे, रवी मेर्शाम, आवेश पठाण, संतोष रडके, सचिन आकुलवार आदी उपस्थित होते.
भंडारा गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने गोसेखुर्द धरण पूर्णपणे भरलेला आहे त्यामुळे धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. यात अनेक शेती, घरेदारे पाण्याखाली आलेले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, आरेर, पिंपळगाव, बेलगाव ,कोलारी ,बेटाळा, रनमोचन, बोढेगोव, किन्ही उदापूर ,पारडगाव, खरकडा, मालडोगरी आदी गाव पाण्याखाली आली असून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून गावांसोबत संपर्क तुटलेला आहे.
प्रशासनाच्या वतीने मदतकार्य सुरू असून येथील लाडज येथील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, सीडीआरएफच्या चार टीम बचाव कार्यात लागलेली आहे. जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत असून ब्रम्हपुरी येथे तळ ठोकून आहे. लाडज येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केला जात आहे. हेलिकॉप्टरने नागरिकांना सुरक्षेसाठी बाहेर काढण्यासाठी गेले असता परिसरातील झाडे, विद्युत तारा आदी कारणामुळे त्यांना बाहेर काढता आले नाही मात्र बोटीच्या माध्यमातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कामी सध्या १२ बोट मदत कार्यास लागल्या आहेत तसेच ७० ते ८० जवानांची टीम कामाला लागली असून पाण्याची पातळी ही काल पेक्षा जास्त आहे. १९९४ नंतर ही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रम्हपुरी शहरातही काही भागात पाणी घुसलेले आहे. येथील गॅस गोडाऊनमध्ये व सालवंट कंपनीमध्ये सुद्धा पाणी शिरल्याने सिलेंडरचा पुरवठा सोमवारी बंद होता. पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य सुरू आहे.
हिंदु मंदिरं खुली करण्यास आम्ही समर्थ ; चंद्रकांत खैरेंचा घणाघात
इम्तियाज जलीलांची मंदिर प्रवेशावरून अखेर माघार!
#अनंत_चतुर्दशी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन कधी? घ्या जाणून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

