Share

परभणीकरांना खुश खबर, नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी : राजेश टोपे

Published On: 

परभणी : परभणी जिल्हाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता याच आधारावर नवीन आरोग्य संस्थाना मंजुरी देण्याबाबतचा आराखडा तयार करण्याची कारवाई सुरु केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. या बाबतचा आरोग्य विभागात लोकसंख्येच्या तुलनेत पदाची तसेच कर्मचाऱ्यांची भरती का हाेत नाही ? या बाबत राष्ट्रवादीचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उपस्थित केला होता.

या बाबत आमदार दुर्राणी यांनी परभणी जिल्हाभरात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रासह इतर ठिकाणी ठरवून दिलेल्या निकषानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. त्यामुळे सध्याच्या आरोग्य यंत्रणेवर खुप ताण येत आहे. तर लोकसंध्येच्या निकषाप्रमाणे रिक्त पदे, पदनिर्मिती करण्याबाबत आरोग्य विभागाची काय कार्यवाही सुरु आहे ? हा प्रश्न दुर्राणी यांनी विचारला होता. तर आरोग्यमंत्री यांनी विधानपरिषदेमध्ये लेखी उत्तर दिले आहे.

या उत्तरात ते म्हणाले की, परभणी मध्ये आरोग्य संस्थांचा मंजुर आकृतीबंधानुसार गट अ ते गट ड संवर्गातील काही पदे रिक्त आहेत. या मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गंत आणि कंत्राटी पद्धतीवरील पदे रिक्त आहेत. ही पदे कंत्राटी तत्त्वावर रिक्त पदे भरुन आरोग्य सेवा सुरळीत करण्यात येणार आहे. असेही त्यांनी या वेळी सांगितले. या मध्ये परभणी जिल्हामध्ये ४०६ खाटांचे जिल्हा रुग्णालय, ६० खाटांचे स्त्री रुग्णालय ( श्रेणी वाढवून) मान्य करत १०० खाटांचे करण्यात आले. तर ५० खाटांचे २ उपजिल्हा रुग्णालये, ३० खाटांचे सात ग्रामीण रुग्णालयांची मंजुरी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!