🕒 1 min read
औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडिच महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबादेतील स्मार्ट सिटी बससेवा २३ जानेवारीपासून वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. आता बसच्या चालक व वाहकपदाची जबाबदारी ५६ माजी सैनिकांवर सोपवण्यात आली आहे. पहिल्या टप्यात ५ मार्गांवर ११ बसेस धावतील.
स्मार्ट सिटी बस सेवा सुरुवातीपासून एसटी महामंडळाचे चालक व वाहक यांच्यामार्फत चालवण्यात येत होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असल्याने जशी एसटीची बससेवा बंद पडली तशीच स्मार्ट सिटी बससेवाही बंद पडली आता एसटीचे काही कर्मचारी कामावर रुजू होत असून काही मार्गावर एसटी बससेवाही सुरू झाली आहे. मात्र सिटी बससेवा सुरू होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ती दूर करण्यासाठी मनपाचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून माजी सैनिकांच्या हाती ही सेवा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ वर्षे चालकपदाचा अनुभव असलेल्या माजी सैनिकांकडे सिटी बसचे स्टिअरिंग सोपवण्यात आले आहे. वाहकांची जबाबदारीही माजी सैनिकांकडेच सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना देशसेवेचा गौरव प्राप्त असलेल्या अनुभवी सैनिकांचे अनुशासन व कार्यक्षमतेचा लाभ होईल. या सेवेचा विस्तार कसा होईल यावर काम सुरू आहे, असे पांडेय म्हणाले. मागील काही महिन्यांत शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उपव्यवस्थापक मुकुल देव आणि सिद्धार्थ बनसोड यांच्या देखरेखीखाली ५६ चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
-
“जे आपल्या उमेदवारांवर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?”
-
“आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
-
Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
-
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
-
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
