🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक विदेशी खेळाडू सहभाग घेतात. काही खेळाडू तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती स्विकारल्यानंतरही आयपीएल स्पर्धेत सहभागी होतात. यापेकी एक नाव म्हणजे एबी डिव्हीलीयर्स.
एबी डिव्हीलीयर्स हा आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळतो. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने तडकाफडकी निवृत्ती स्विकारली होती. मात्र निवृत्तीनंतरही अनेकदा एबीच्या पुनरागमनाची चर्चा रंगत असते. मात्र मागील महिन्यात दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी डिव्हीलीयर्सच्या पुनरागमनाबद्दल संकेत दिले होते. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक ग्रॅमी स्मिथनेही जुनमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात एबी पुनरागमन करु शकतो असे म्हणाला आहे.
????BREAKING NEWS????
Cricket South Africa Director Graeme Smith has today confirmed that SA will travel to WI in June for 2 Tests and 5 T20is at venues yet to be finalised
He also said he is hopeful of free agents AB De Villiers, Imran Tahir and Chris Morris playing pic.twitter.com/LLEJbQwXJG
— Caribbean Cricket Podcast (@CaribCricket) May 6, 2021
२०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती स्विकारल्यानंतर एबी जगभरात अनेक व्यवसायीक टी-२० स्पर्धेत सातत्याने चांगली कामगीरी करत आहे. मार्क बाऊचरच्या वक्तव्यानंतर एबीने आयपीएलनंतर बाउचरसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. दक्षिण आफ्रिका जूनमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात २ कसोटी आणि ५ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाजार समित्या काही दिवस बंद ठेण्याबाबत लोकप्रतिनिधीशी चर्चा करणार – छगन भुजबळ
- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘या’ दोन आयुर्वेदिक औषधांचं देशभरात होणार वाटप
- मुश्रीफांना मला विकूनच ते पैसे वसूल करावे लागतील, चंद्रकांत पाटलांचा टोला
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
