Share

मुश्रीफांना मला विकूनच ते पैसे वसूल करावे लागतील, चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

कोल्हापूर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

या निकालानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला,’ असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

पाटलांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब यांच्याबद्दल पाटील यांनी केलेले दर्पोक्तीयुक्त वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. जणूकाही जामीन कोर्टातून रद्द करणार, अशा आविर्भावात चंद्रकात पाटील वक्तव्य करत होते. भुजबळ साहेबांनी संपूर्ण हयात राजकारण आणि समाजकारणात काढली आहे. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलीहोती.

मुश्रीफांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावं लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते शनिवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!