Share

#होरपळतोय_महाराष्ट्र : गोदावरी आटली, पाण्याआभावी माशांची तडफड सुरू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरात सध्या भीषण दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे असले तरीही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधींकडून सध्यातरी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे समोर येत आहे.

नागावातून वाहणारी गोदावरी नदी पूर्णपणे कोरडी पडली असून या कोरड्या नदीत पाण्याअभावी माशांची तडफड सुरू असल्याचं हृदयद्रावक चित्र पहायला मिळत आहे. एएनआयनं नुकतेच काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमधून दुष्काळाची दाहकता आणि भीषणता आपल्याला दिसून येतेय.

एनआयएने ट्विट केलेले फोटो औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील नागांवातील आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात गोदावरी नदी एकदम कोरडी पडली असून माणसं आणि जनावरांसाठीही पाणी उरलेलं नाही. स्थानिकांच्या मते, अजूनपर्यंत त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाहीये.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!