Share

Sanjay Raut । “जनतेत जाऊन सत्ता परिवर्तन करणार”; संजय राऊत पुन्हा आक्रमक

Published On: 

Sanjay Raut । मुंबई : जवळपास १ महिना होत आलं राज्यात अजूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकार टीका करत आहेत. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार टीका केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य त्यांनी केलं होत. तर यानंतर राऊतांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला होता.

एकनाथ शिंदे म्हणाले होते कि, ‘त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात. राज्यात 166 आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असा जोरदार टोला शिंदेंनी राऊतांना लगावलाय. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेनंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा पलटवार केलाय.

संजय राऊत म्हणले कि, तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व दाखवा. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं. पण आम्हाला महाराष्ट्र सत्ता आणायची आहे. मात्र मिळेल त्या मार्गाने नाही. राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे. ठीक आहे कोणाला हे स्वप्न वाटत असेल. पण लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची आहे, ती वेळ लवकरच येईल, असं म्हणत त्यांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं आहे.

दरम्यान, याआधी सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तसेच स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या शेड्युल्ड नुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी लगावला. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!