Share

मद्य उत्पादकांना सवलती देता मग शेतकऱ्यांना का नाही?- प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून(२२ डिसें.)सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी मद्य उत्पादकांना सवलती देता मग शेतकऱ्यांना का नाही?, असा सवाल केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा प्रविण दरेकर यांनी व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’महाराष्ट्रात नवीन वीज कनेक्शन देण्याचे आश्वासन देऊन ही ते पूर्ण केले नाही.’ तसेच कोरोना, अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्याचे तात्काळ वीजकनेक्शन कापणे थांबवणार का? मद्य उत्पादकांना सवलती देता मग शेतकऱ्यांना का नाही? चुकीची बिलं तुरुस्त करुन त्यांना टप्प्या-टप्प्याने पैसे देण्याच्या सवलती देणार का? , असे सवालही प्रवीण दरेकरांनी केले आहेत.

दरम्यान, अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. या मुद्द्यावरुन भापने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने या टीकेला सुरूवात झाली असून त्यानंतर प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!