Share

‘भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही’

Published On: 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात तब्बल सहा सभा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी देखील काल जोरदार भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील प्रहार केला आहे.

‘पत्नीच्या बरोबर बहीण आली करवली म्हणून. धनंजय मुंडे म्हणाले, वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय सारखच. दोघी बहिणी बहिणी एकत्र राहावा. मग एकदा वीज कनेक्शन घेतलं की मीटर पडणारच. मीटर पडलं आणि दोन पोरं झाली. त्या दोन पोरांना आपलं नाव दिलं. त्यांना विचारलं तू कस नाव देतोयस ? ते म्हणाले मला भीती देखील नाही वाटली. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामीत्वाचे स्वीकारले पाहिजे. असं सांगताना देखील भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही,’ असा शाब्दिक प्रहार लक्ष्मण ढोबळे यांनी केला आहे. त्यांच्या भाषणावेळी चांगलाच हशा पिकला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!