Share

Shripal Sabnis : सध्याची राजकीय व्यवस्था पाहता नवे निर्दोष राजकारणी जन्माला घालण्याची गरज – श्रीपाल सबनीस

Published On: 

बुलडाणा : शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. हे सर्व ३९ आमदार आणि अपक्ष ११ आमदार सोबत घेऊन शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. यानंतर ठाकरे सरकार कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सध्याच्या या सर्व घडामोडींवर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना सबनीस म्हणाले कि, आताचे राजकीय संदर्भ हे अतिशय भ्रष्टाचारी असल्याचं पाहायला मिळत आहेत जे लोकशाहीला मारक असून, राजकीय व्यवस्था ही जगवायला की मारायला उभी..? असा त्यांनी उपस्थित केला. बुलडाणा शहरात एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने ते आले असता आत्ताच्या राजकीय परिस्थिती संदर्भात त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनमोकळेपणाने आपली मत व्यक्त केल.

राजकारण्यांना सत्याची नव्हे तर सत्तेची काळजी आहे, त्यामुळे या राजकीय व्यवस्थेवरून आता विश्वास उडाला असून, ही राजकीय व्यवस्था लोकशाहीला पराभूत करणारी आहे, त्यामुळे समाजातील साहित्यिकांसह इतर सर्वच विचारवंतांनी एकत्रित येऊन निर्दोष व नवीन राजकारणी जन्माला घालने ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!