पारनेर : सध्या कोरोनाच्या महाभयंकर आजाराने सर्वच घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे, यात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रावर परिणाम झाला असून शेतकरी राजा पूर्णतः तोट्यात आहे. शेतात पिकलेला माल आज पूर्णपणे शेतात पडून असल्याने तो विकायचा कुणाला असा मोठा सवाल प्रत्येक शेतकरी वर्गाला आहे.
पारनेर तालुक्यातील शेतकरी वर्गाची अशी मागणी आहे कि, शेतात पिकलेला भाजीपाला, फळे हा असाच शेतात पडून असल्याने तो माल राजकीय कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, मदतनीस संस्था इत्यादी नी खरेदी करून जर गोर गरिबांना पोहच केला तर चार पैसे शेतकऱ्यांना भेटतील व गरिबांना भाजीपाला, फळे भेटेल. अशी मागणी सध्या पारनेर तालुक्यातील शेतकरी करताना दिसत आहेत. या मागणी कडे संबंधित व्यक्तींनी लक्ष द्यावे अशी मागणी आहे.
दानशूर अनेक संस्था व व्यक्ती गरजवंताना अन्न वाटप करीत आहेत.माझी अशा सर्व व्यक्ती व संस्थांना विनंती आहे की,अन्न सरकार देत आहे.तेव्हा पालेभाजी,टरबूज,द्राक्ष सारखी फळ शेतात सडून जात आहेत. शेतकरी कवडीमोल दराने विकत आहे,तेव्हा सर्व दानशूर व्यक्ती, राजकारणी व्यक्ती व संस्थांनी हे शेतमाल खरेदी करून वाटप करावे.त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल.आणि गरजवंतांना व त्यांच्या लेकरांना फळे खायला मिळतील.त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढेल.तेव्हा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या,तो कोरोना लॉकडाऊनमुळे उध्वस्त झाला आहे.असे केल्याने सामाजिक संतुलन ठेवता येईल. व शेतकऱ्यांना नुकसानीतून सावरण्यासाठी मदत होईल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
