पुणे : पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात १४१ नव्या रुग्णांना करोनाची लागण झाली असून परिसरातील रुग्णसंख्या ३५६७ वर पोहोचली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शुक्रवारी रात्री याबाबत माहिती देण्यात आली. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी सुमारे १ हजार 8 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १४१ रूग्णांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले. गेल्या काही दिवसांत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करून जास्तीत जास्त संशयित रूग्णांची तपासणी केली जात आहे.
नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील १२१, ग्रामीण भागातील तीन, पिंपरी-चिंचवडमधील चार तर छावणी परिसरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण ३९ ते ८० वर्षे वयोगटातील आहेत. सर्व रुग्णांची गुंतागुंतीच्या आजाराची पाश्र्वभूमी होती. पुणे शहरातून शुक्रवारी १४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १६३० झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून आतापर्यंत ११६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होतायत ; युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आजीबाईंचा समावेश
शुक्रवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १०६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६७ तर खासगी रुग्णालयांमध्ये २९ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ९९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
लॉकडाऊन 4.0साठी अमित शहांच्या बैठकांवर बैठका, नवीन अटी व नियम लागू होण्याची शक्यता
#कोरोनाविरुद्धलढा : दिलासादायक बातमी ‘कोरोना’चा संसर्ग झालेले बरे होण्याचे प्रमाण वाढले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

