बंगळुरू: देशभरात गाजलेल्या हिजाब प्रकरणावर आज (१५ मार्च) रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. या प्रकरणाचा निकाल काय लागणार याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शेवटी हा निकाल आला आहे. या प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयाने असे म्हणले कि हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. तसेच हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारकही नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात हिजाब परिधान करण्याला अनुमती द्यायची की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा निर्णय आहे. असा ऐतिहासिक निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.
या संदर्भात करण्यात आलेल्या सर्व याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर, विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कर्नाटकातील शाळा, महाविद्यालयात घालण्यात आलेल्या हिजाब बंदीवर कोर्टाने एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. शाळा, महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
हिजाब प्रकरण गेल्या काही दिवसात चांगलेच तापलेले होते. त्यामुळे कर्नाटकातील शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर निकाल आल्यानंतर देशात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

