Share

मराठा समाजाला शिक्षणात सवलत द्या, ३ हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

Published On: 

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्य सरकारच्या बेफिकीरमुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याची घणाघाती टीका यावेळी राणे यांनी केली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा आरक्षण मिळालं ते मान्यही झालं आणि टिकलंही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यामुळं योग्य पद्धतीनं बाजू मांडली नाही, असा आरोप नारायण राणे केला आहे. तसंच मराठ्यांनी आता राज्य सरकारला कारभार करता येणार नाही, असं तीव्र आंदोलन करावं असं आपलं मत असल्याचंही नारायण राणे म्हणाले.

राज्य सरकारच्या बेफिकीरमुळेच मराठा आरक्षण गेल्याचं सांगतानाच मराठा समाजाला रोजगार द्या, शिक्षणात सवलत द्या आणि तीन हजार कोटींचं पॅकेज द्या, अशी मागणी नारायण राणे यांनी आज केली. भाजपच्या प्रत्येक मराठा नेत्याने एका एका जिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणविषयक पक्षाची भूमिका समजावून सांगण्यास सुरुवात केली आहे. आज नारायण राणे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण व रोजगारासाठीच्या सवलती द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द होण्याआधी मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना सरकारी नोकरीत तातडीने सामावून घ्यावे, अशी मागणी राणेंनी केली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचा राज्य सरकारकडे पर्याय आहे. पण आजपर्यंत त्यांनी तसे केलेले नाही आणि मुदत संपत चालली आहे. मराठा समाजाचे असलेले आरक्षण गमावले तरीही आघाडी सरकारची बेफिकिरी कमी होत नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने मात्र 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!