Share

‘बांधकाम कामगारांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कामगारांना 5000 रु अनुदान द्या’

Published On: 

सोलापूर : राज्यात आज चार नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह आता राज्यात कोरोनाग्रस्थांचीवर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या ४ रुग्णांना पैकी ३ पुण्यातील आणि १ साताऱ्यातील असून. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.

राज्यात काल एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला होता तर रात्री उशिरापर्यंत ८ नवे करोना रुग्ण आढळले होते. काल दिवसभरात राज्यात २३ नवे कोरोना ग्रस्थ आढळले त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी देखील लागू करण्यात आली तसेच कालपर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७ वर पोहोचली होती आज तोच आकडा १०१ झाला आहे.

दरम्यान, राज्यात संचारबंदीमुळे असंघटीत बांधकाम कामगारांना कुठेही कामास जात येत नसल्यामुळे त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा झाला आहे बांधकाम कामगारांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बांधकाम कामगारांना 5000 रु अनुदान तात्काळ मिळणेबाबत भाजप नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना विनंती केली.

तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे. या रोगाचे संक्रमण पूर्णत: थांबविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने येऊ नये, घरीच राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या काळात कामगार व कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्व कारखानदार आणि व व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

यासंदर्भात कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी राज्यातील सर्व कामगार उपायुक्त, सहायक आयुक्त, कामगार अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीतील माथाडींसह सर्व खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी कोणत्याही तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढून टाकू नये किंवा त्यांच्या वेतनात कपात करू नये, अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!