🕒 1 min read
मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती.
येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. यामुळे दबावात असलेल्या शिवसेनेला त्यांचा राजीनामा घेतल्या शिवाय सध्या तरी कोणताही पर्याय समोर नव्हता.
संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. यानुसार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. मात्र, आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा मंजूर करू नये, अशी अट संजय राठोड यांनी घातली होती. वाढता दबाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई अटळ असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केल्याचं वृत्त एका वाहिनीने दिला आहे. मात्र, अद्यापही याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
राठोड राजीनाम्यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘आता संजय राठोड चा राजीनामा म्हणजे सरकारचं तेलपण गेल तुप पण गेल असा स्वरूपाच आहे. १५ दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला असता तर उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत हे पटलं असतं मात्र त्यांनी इतके दिवस लोकक्षोभ होईपर्यंत गप्प बसणं यातच त्यांची सत्ताअपरिहार्यता दिसून येते. ‘ अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
आता राजीनाम्याने राठोड गेले पण सरकारचा खरा चेहराही समोर आला. सरकारच्या हाती असंवेदनशीलतेच धुपाटण राहिले पूजा चव्हाण ला न्याय मिळाला यासाठी भाजपाचा संघर्ष सुरूच राहिल.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 28, 2021
पुढे त्यांनी पूजा चव्हाण साठीचा लढा हा सुरूच राहील असं देखील सांगितलं आहे. ‘आता राजीनाम्याने राठोड गेले पण सरकारचा खरा चेहराही समोर आला. सरकारच्या हाती असंवेदनशीलतेच धुपाटण राहिले पूजा चव्हाण ला न्याय मिळाला यासाठी भाजपाचा संघर्ष सुरूच राहिल.’ असा निर्धार देखील केशव उपाध्ये यांनी जाहीर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : संजय राठोड यांनी राजीनामा सोपवला, पण…
- बहन मायावती आरपीआय मध्ये आल्यास त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू – रामदास आठवले
- ‘जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेस मध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेसचे काही भले होणार नाही’
- मोठी बातमी : अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला ; मुख्यमंत्री मंजूर करणार का ?
- उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या करिष्म्याला आरपीआयची साथ; आठवलेंनी केली मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
