Share

Girish Mahajan | जिंकणं हे आता शिवसेनेचं स्वप्नच बनून राहणार- गिरीष महाजन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना पक्ष डगमळीत झाला आहे. शिवसेना पक्ष पुन्हा पुर्वीसारखा करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दौरे करायला सुरूवात केली आहे. त्यांच्या या दौऱ्यांवरून अनेक नेत्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

गिरीष महाजन यांची टीका-

शिवसेनेचे जिंकणे हे आता स्वप्नच बनून राहणार आहे, असं म्हणत गिरीष महाजन यांनी शिवसेनेवर हल्ला  कला आहे. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे, ते आपण बघत आहोत. त्यांनी हाताने आणि स्वत:हून अशी परिस्थिती ओढवून घेतली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आता दौरे करून काय मिळणार?-

अशी परिस्थिती असताना, आता दौरे करून काय मिळणार, तसेच स्वत:च स्वत:च्या पेपरमध्ये लिहून आणून काय होणार आहे ?, असा सवालही गिरीष महाजन यांनी शिवसेनेला विचारला आहे. गिरीष महाजन यांनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी सांवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, शिवसेना पक्ष पुन्हा पुर्वीसारखा करण्यासाठी तसेच शिवसैनिक बांधून ठेवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दौरे घेत आहेत.त्यांनी घेतलेल्या दौऱ्यांना प्रतिसादही मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे गिरीष महाजन यांनी दौऱ्यांवरून केलेल्या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!