Share

‘पोलिस यंत्रणेला खंडणी जमा करायला लावणे यापेक्षा लाजीरवाणी बाब होऊच शकत नाही’

Published On: 

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजप आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, अनिल देशमुख यांनीच सचिन वाझे याला दर महिन्याला १०० कोटी खंडणी गोळा करायला सांगितले होते, असा अत्यंत खळबळजनक आरोप मुंबई पोलीस आयुक्तांसारखे सर्वोच्च पद भूषविलेल्या व सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने पत्राद्वारे केला आहे.राज्याच्या पोलिस यंत्रणेला खंडणी जमा करायला लावले जाते, टार्गेट दिले जाते यापेक्षा लाजीरवाणी बाब होऊच शकत नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात राज्याच्या गृहमंत्र्यांवर एखाद्या सर्वोच्च अधिकाऱ्याने इतके गंभीर लेखी आरोप कधीही लावले नाहीत.

पुढे ते म्हणतात,गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप अतिशय धक्कादायक व महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारे आहेत.अनिल देशमुख यांचा तत्काळ राजीनामा घेऊन संबंधित प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांद्वारेच चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!