नवी दिल्ली : सध्या राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं आहे. तसेच काही देशातील झालंं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक उलाढाली होताना दिसून येतं आहेत. अशताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाचा मोठा धक्का बसला असल्याचं समजतं आहे. गुलाम नबी आझाद बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. त्याचप्रमाणे ते पक्षाच्या धोरणांबद्दलही नाराज होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसने त्यांना जम्मूमधील जबाबदारी दिली होती, परंतू त्यांनी यापुर्वीच त्याही पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा पत्र त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले आहे.
त्या पत्रामध्ये त्यांनी अत्यंत खेदानं आणि अंतः करणानं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी राजीनामा देण्यामागची कारण घ्या जाणून.
गुलाम नबी आझाद यांची पक्ष सोडण्यामागची कारणे खालीलप्रमाणे –
1. गुलाम नबी आझाद यांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं जावं, अशी त्यांची इच्छा होती. गुलाम नबी आझाद राज्यातील सगळ्यात मोठा नेता होण्याचं आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असण्याची आशा बाळगून होते. त्यांचे समर्थकांनाही त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जोर धरत होते.
2.काँग्रेस कमिटीतील इतर सदस्यांच्या निवडीबाबत गुलम नबी आझाद यांचं मत काय आहे, याबाबत त्यांना वाचरणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्य पातळीवर अनेक नेते नाराज होते.
3.काँग्रेस कार्यकारीणीत सदस्य असलेल्या गुलाम नबी आझाद यांना राज्यातीलही कमिटीत ठेवण्यात आलं होतं. असं केल्यानं आपली राष्ट्रीय पातळीवरील ताकद कमी होते, अशी भावना तयार झाली असल्याचंही त्यांना वाटत होतं.
4.गुलाम नबी आझाद यांना कॅम्पेन कमेटीचं अध्यक्ष करण्याची घोषणा होण्याआधी महासचिव वेणुगोपाल यांनी वरिष्ठ नेत्यांना सूचिक करण्याच्या परंपरेकडे लक्ष नव्हतं दिलं. त्यामुळे या गोष्टी बाहेर येऊ शकल्या नसत्या, अशी दाट शक्यता होती.
5.तारीख हमी कर्रा यांसारख्या एका वादग्रस्त नेत्याच्या खाली एका कमिटीत त्यांना ठेवलं गेलं होतं. ही बाब कुठेतरी गुलाम नबी आझाद यांना खटकत होती. त्यामुळे ते अनेक दिवस अस्वस्थ होते. त्याची नाराजीही त्यांनी अनेकदा उघड केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | बहुमत असुनही मोदी सरकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घाबरते- शिवसेना
- Shivsena । भाजपाचे बहुमत निखळ नाही, ते चोरलेले आहे; शिवसेनेचा हल्लाबोल
- Ajit Pawar | शिंदे सरकारला मान्यता मिळाल्यास लोकशाहीला धोका- अजित पवार
- Winter Session | तारीख ठरली! या वर्षीचं हिवाळी अधिवेशन होणार ‘या’ तारखेला
- Supriya Sule | …म्हणून दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो- सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

