🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : पुणे जिल्ह्यातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील शेतीला वरदान ठरणारे घोड धरण काल ओव्हर-फ्लो झाले. धरणात सध्या ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असला, तरी नव्या पाण्याची आवक पाहता, धरणातून दोन्ही कालवे व नदीत विसर्ग सुरू करून जलसंपदा विभागाने धरण ओव्हर-फ्लो झाल्याचा संदेश लाभधारकांना दिला.
दरम्यान, धरणावर जाऊन माजी आमदार राहुल जगताप ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्यासह राष्ट्रवादी-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जलपूजन केले. पुणे जिल्ह्यातील शिरूर व नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील मोठी शेती घोड धरणाच्या लाभक्षेत्रात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घोडच्या पाण्यावर या भागातील शेती फुलत आहे. घोडच्या पाण्यावर परिसरातील सात ते आठ कारखाने अवलंबून असतात. घोडमुळे या भागातील उसाचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे.
दरवर्षी परतीच्या पावसापर्यंत धरण भरण्याची वाट पाहावी लागते. यंदा मात्र धरण लवकरच भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्यास नदीला सोडलेल्या पाण्याबाबत विचार करावा लागेल असे घोडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकरी चळवळीतील नेते व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील कोरोना ‘पॉझिटिव्ह’
..तर, येत्या काळात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल : खा. सुजय विखे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
