अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दररोज पाचशेच्यावर रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनची मागणी करणारे नगर दक्षिणचे भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे मात्र, गेल्या काही दिवसांपासून के.के.रेंजच्या प्रश्नावर गावोगावी 400 ते 500 लोकांच्या बैठका घेवून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत.या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत आहे.
खासदारांना कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा आहे की, वाढवायचा आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक लक्षात घेवून खा.विखे यांना नगर जिल्ह्यात फिरण्यास बंदी घालावी, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली होती.
..तर, येत्या काळात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल : खा. सुजय विखे पाटील
मनसेच्या या मागणीवर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” मी कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात फिरत आहे. काही ठिकाणी बैठका घेतल्या. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र जर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर मी तयार आहे, ” असे ते म्हणाले.
शेतकरी चळवळीतील नेते व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील कोरोना ‘पॉझिटिव्ह’
यासोबतच त्यांनी जर माझ्यावर गुन्हा दाखल करणार असाल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरही गुन्हा दाखल करा असा घणाघात केला आहे. “माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या 300 लोकांवरही गुन्हे दाखल करा,”अशी टीका सुजय विखेंनी केली आहे.
वंचितला सोडचिठ्ठी देत माजी आमदारांचा भाजपात प्रवेश, शिवसेनेने केले मोठे… कोण आहेत नेते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

