Share

शेतकरी चळवळीतील नेते व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील कोरोना ‘पॉझिटिव्ह’

Published On: 

इस्लामपूर : राज्यातील लोकप्राधिनिधींना असलेला कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने जनसामान्यांना असलेला धोका देखील वाढत आहे. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

काल रात्री त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. ” माझी कोवीड19,पाॅझिटीव आली आहे मी आता उतम आहे,व मी क्वॉरनटाईन,झालो आहे,तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन,” अशा शब्दांत त्यांनी कोरोनावर मात करण्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

वंचितला सोडचिठ्ठी देत माजी आमदारांचा भाजपात प्रवेश, शिवसेनेने केले मोठे… कोण आहेत नेते

सदाभाऊ खोत हे शेतकरी चळवळीतील अग्रणी नेत्यांपैकी आहेत. त्यांनी महायुती सरकारच्या काळात कृषी राज्यमंत्री पद भूषवले आहे. तर, याआधी कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा देखील बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदारांपाठोपाठ खासदार देखील पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. यातच कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सांगलीतील माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देखील लागण झाली आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून 2 दिवस होणार पावसाळी अधिवेशन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!