अहमदनगर : सुरुवातीपासुनच राष्ट्रवादीला झुकते माप देत जास्त महत्व दिले जाते असे काँग्रेस नेत्यांनी केलेली तक्रार व अनेक कुरबुरी चालुच असल्याचे दिसून आले होते. काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी निधी वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचे सांगत आपली नाराजी उघड केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीत उभी फूट निर्माण होत असून काँग्रेसचे तब्बल ११ आमदार नाराज असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते.
“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करु, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट होते. “आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही. मतदार संघाच्या प्रश्नांसाठी आमदार नाराज आहेत. आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे त्यांनी सांगितले.
शेतकरी चळवळीतील नेते व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील कोरोना ‘पॉझिटिव्ह’
यावर आता अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी देखील भाष्य केले आहे. “काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्याचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला विखेंनी लगावला आहे. तसेच “तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात,” असेही सुजय विखे म्हणाले.
वंचितला सोडचिठ्ठी देत माजी आमदारांचा भाजपात प्रवेश, शिवसेनेने केले मोठे… कोण आहेत नेते
यासोबतच त्यांनी येणाऱ्या काळाबाबत भाकीत देखील केले आहे. “महाराष्ट्राचा विकास थांबेल त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. मंत्री समाधानी आहेत. मात्र आमदार नाराज आहे. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,” अशी खोचक टीका त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर केली आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून 2 दिवस होणार पावसाळी अधिवेशन
दरम्यान, निधी वाटपावरून नाराज असलेले आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी दोन दिवसांपूर्वी फोनवरून संपर्क साधत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी योग्य निधीवाटपाचे आश्वासन दिले होते. यानंतर काळ गोरंट्याल यांनी मंत्रालयात दाखल होत अजित पवार यांची भेट देखील घेतली. त्यामुळे अजित पवारांनी आघाडीतील नाराजी तात्काळ दूर केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

