मुंबई : न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस क्रेन्स यांचा जीव वाचला आहे. पण त्याच्या पायाला लकवा मारला आहे. 51 वर्षीय माजी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियात त्याच्या राहत्या घरी परतला आहे. परंतु त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. सिडनीमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून तो अनेक गंभीर समस्यांशी झुंज देत आहे. त्याचे वकील आरोन लॉयड यांनी ही माहिती दिली आहे.
आरोनने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे, ‘ख्रिसने आपले प्राण वाचवण्यासाठी हृदयाचे ऑपरेशन केले, त्या दरम्यान त्याला स्पाइनल स्ट्रोक आला. यामुळे त्याचे पाय अर्धांगवायू झाले आहेत. आता त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील स्पाइनल कॉर्डच्या स्पेशल हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहेत.
क्रिस केर्न्सची ही अवस्था बघून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर चिंतेत आहे. केर्न्स लवकर बरा व्हावा, म्हणून सचिनने प्रार्थना केली आहे.
क्रिस केर्न्सबाबत ऐकून दु:खी झालो आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. लवकर बरा हो मित्रा. क्रिकेटशी जोडले गेलेले सगळे तुझ्या लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत, असं ट्वीट सचिनने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.

केर्न्स आणि सचिन 2003 पर्यंत बराच काळ एकमेकांविरुद्ध खेळले. हे दोन्ही खेळाडू 28 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकमेकांसमोर आले. क्रिस केर्न्सने भारताविरुद्ध अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंग्लंडकडे अजुनही डावाने सामना जिंकण्याची संधी’, डॉमीनिक कॉर्कने व्यक्त केला विश्वास
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
